Book on Mobile Phone , Mobile Towers and Health Hazard.
मोबाईल फोनचा वापर करीत नाही अशी व्यक्ती विरळाच! सगळीकडे मोबाईल टॉवर्स उभे राहिलेले दिसतात. त्यामधील अधिकांश टॉवर्स हे अनधिकृत आहेत. मोबाईल फोन, मोबाईल टॉवर, टॅब, वाय- फाय इ. वायरलेस उपकरणांमधून उद्भवणाऱ्या रेडिएशनबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये अज्ञान आहे. हा विषय सर्वसामान्य नागरिकांच्या आणि त्यांच्या पिढ्यांच्या आरोग्याशी निगडित आहे. ३१ मे २०११ रोजी आय. ए. आर. सी. (इंटनॅशनल असोसिएशन फॉर रिसर्च व कॅन्सर, जागतिक आरोग्य संघटनेची उपशाखा ) यांनी "इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन " (मोबाईल फोन, मोबाईल टॉवर इ. पासून होणारे वायरलेस रेडिएशन ) यास class 2B कॅन्सरकारक गटामध्ये समाविष्ट केलेले आहे. त्यानंतर जगातील सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये याविषयी भरपूर संशोधन झालेले आहे आणि होत आहे. त्यामधये असे आठळून आलेले आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीराच्या जवळजवळ सर्व प्रणालींमध्ये रोग होतात. उदा. निद्रानाश, डोकेदुखी, थकवा, नपुसंकत्व, वांझपणा, हृदयरोग, कॅन्सर इ. मोबाईल फोन व टॉवर रेडिएशनचे दुष्परिणाम आणि घ्यावयाची काळजी या पुस्तकामध्ये रेडिएशन संबंधित सरकारी मानके ही कशी कुचकामी आणि कालबाह्य आहेत याविषयी विवेचन केलेले आहे व असे दाखववून दिलेले आहे की, या तथाकथी त सरकारी मणक्यांच्या कितीतरी खालच्या पातळीवर होणाऱ्या रेडिएशन जीवनशास्त्रीय दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे हि सुरक्षा मानके जीवनशात्रीय दुष्परिणाम लक्षात घेऊन अधिक सक्षम करावी लागतील. श्री. सुरेश कर्वे, श्री मिलिंद बेंबळकर यांनी या विषयावरील संशोधन लेखांचा ८ ते १० वर्ष अभ्यास करून मराठी वाचकांसाठी हे पुस्तक लिहिलेले आहे. बहुधा बायो इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स या विषयातील हे पहिलेच मराठी पुस्तक असावे. सध्या जे लोक वायरलेस उपकरणांच्या (मोबाईल फोन, टॅब इ. ) आहारी गेलेले आहेत. त्यांच्यासाठी व त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि जीवनरक्षक ठरेल हे निश्चित
उपरोक्त पुस्तक http://www.bookganga.com वर Print Book आणि E-Book या Format मध्ये उपलब्ध आहे. जरूर वाचावे.
उपरोक्त पुस्तक http://www.bookganga.com वर Print Book आणि E-Book या Format मध्ये उपलब्ध आहे. जरूर वाचावे.
No comments:
Post a Comment